लोंढा ते मिरज या दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरणाचे काम सुरू असल्याने या मार्गावरील कांही रेल्वे रद्द तर कांही रेल्वेच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. तरी प्रवाशांनी पुढील कांही दिवसांसाठी संबंधित रेल्वेच्या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन नैऋत्य रेल्वेने केली आहे.
म्हैसूर -बेळगाव दरम्यान धावणारी विश्वकर्मा एक्सप्रेस 22 एप्रिल ते 4 मे दरम्यान, तर बेळगाव ते म्हैसूर एक्सप्रेस 23 एप्रिल ते 5 मे दरम्यान रद्द करण्यात आली आहे. हुबळी -दादर एक्सप्रेस 23 एप्रिल ते 4 मे दरम्यान, तर दादर -हुबळी एक्सप्रेस 24 एप्रिल ते 5 मे दरम्यान रद्द करण्यात आली आहे. बेळगाव -शेडबाळ आणि शेडबाळ -बेळगाव पॅसेंजर 28 एप्रिल ते 4 मे दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
तिरूपती -कोल्हापूर हरिप्रिया एक्सप्रेस 23 एप्रिल ते 4 मे दरम्यान हुबळी येथून धावणार आहे, तर कोल्हापूर -तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस 24 एप्रिल ते 5 मे दरम्यान हुबळीपर्यंत धावणार आहे. बेंगलोर -बेळगाव सुपरफास्ट एक्सप्रेस 27 एप्रिल ते 3 मे दरम्यान धारवाडपर्यंत धावणार आहे, तर बेळगाव -बेंगलोर सुपरफास्ट एक्सप्रेस 28 एप्रिल ते 4 मे दरम्यान धारवाड येथून निघणार आहे.
बेंगलोर -जोधपुर साप्ताहिक एक्सप्रेस 25 एप्रिल व 2 मे रोजी, तर जोधपुर -बेंगलोर एक्सप्रेस 23, 28 व 30 एप्रिल रोजी, त्याचप्रमाणे म्हैसूर -अजमेर साप्ताहिक एक्सप्रेस 26, 28 एप्रिल व 3 मे रोजी गदग -बागलकोट -विजापूर -होटगी, सोलापूर मार्गे पुण्याला वळविण्यात आले आहेत. याप्रमाणेच अजमेर -म्हैसूर साप्ताहिक रेल्वे 21, 29 एप्रिल 1 मे रोजी, बेंगलोर -अजमेर साप्ताहिक रेल्वे 29 एप्रिल, तर बेंगलोर -गांधीधाम एक्सप्रेस 30 एप्रिल रोजी, बेंगलोर -जोधपूर
साप्ताहिक रेल्वे 24 एप्रिल ते 1 मे रोजी गदग -बागलकोट -विजापूर -होटगी, सोलापूर मार्गे पुण्याला वळविण्यात आल्या आहेत. एर्नाकुलम -पुणे साप्ताहिक रेल्वे 25 एप्रिल व 2 मे रोजी मडगाव, रोहा, पनवेल मार्गे पुण्याला वळविण्यात आली आहे. तरी प्रवाशांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन नैऋत्य रेल्वेने केले आहे.