सुळगा -उचगाव ग्रामपंचायतीमधील रोजगार हमी योजनेच्या प्रलंबित बिलांसंदर्भात गावातील सुमारे 500 महिलांनी आज शनिवारी तालुका पंचायतीवर मोर्चा काढून निवेदन सादर केले.
सुळगा -उचगाव ग्रामपंचायत अध्यक्ष आणि माजी ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर यांच्या नेतृत्वाखाली रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या 500 महिलांनी आज तालुका पंचायतीवर मोर्चा काढला.
यावेळी तालुका पंचायत अधिकारी राजेंद्र मनवाडकर यांची भेट घेऊन रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रलंबित असलेल्या दोन बिलांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच संबंधित दिले त्वरित अदा करण्याची मागणी करण्यात आली.
अधिकारी मनमाडकर यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या महिलांची बाजू ऐकून घेतली. तसेच संपूर्ण कालावधी काम केलेल्या महिलांची बिले त्यांच्या खात्यावर येत्या आठ दिवसात जमा करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी सूळगा परिसरातील अनेक जण उपस्थित होते.