बेळगावातील शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस खात्याकडून चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असून बंदोबस्तासाठी तब्बल 2231 पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे परराज्यातून 736 पोलिसांना पाचारण करण्यात येणार आहे. याखेरीज मिरवणूक मार्गावर तीन ड्रोन कॅमेराची नजर असणार असून 65 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत.
शिवजयंती आणि चित्ररथ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 15 दिवसांपासून पोलिस खात्याकडून तयारी केली जात आहे. मध्यवर्ती शिवजयंती महामंडळ शिवजयंती आणि चित्ररथ महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा होत आहे. त्याचबरोबर मिरवणुकीच्या मार्गाची वरिष्ठ अधिकार्याने अनेक वेळा पाहणी करून बंदोबस्तबाबत स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. पोलीस बंदोबस्त असला तरीही सर्व मंडळांनी स्वयंसेवकांची नियुक्ती करावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे. चित्ररथ मिरवणूक विचार सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सर्व घडामोडींवर पोलिसांची बारीक नजर असणार आहे.
मिरवणुकीवर साध्या वेशातील पोलीसही लक्ष ठेवून असणार आहेत. सर्वांनी चित्ररथ मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे करू नये. कायदा व सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी दिला आहे.
शिवजयंती चित्ररथ मिरवणूक बंदोबस्तासाठी पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली 2 पोलिस उपायुक्त, 15 पोलीस उपअधीक्षक /एसीपी, 40 पोलीस निरीक्षक, 140 पोलीस उपनिरीक्षक, केएसआरपीच्या 12 तुकड्या ( तीनशे पोलीस), 42 सीआरपीएफ जवान, तीन (30 कर्मचारी) तोडफोड विरोधी पथके, 1200 पोलीस कॉन्स्टेबल -हेडकॉन्स्टेबल आणि 400 होमगार्ड तैनात असणार आहेत.