बेळगाव पोलिसांनी शहरातील सर्व देवस्थाने,मशिदी,चर्च आणि मॉलना लाऊड स्पीकरच्या वापराबाबत नोटिशी बजावल्या आहेत लाऊड स्पीकर मध्ये मोठा आवाज न करण्याचा उल्लेख नोटीस मध्ये करण्यात आला आहे.
बेळगाव शहर परिसरातील सर्व पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये येणाऱ्या सर्व प्रार्थना स्थळांना चर्च,मॉलना नोटीस वाटण्यात आल्या आहेत.
सर्व प्रार्थना स्थळांना बजावण्यात आलेल्या नोटीसची प्रत बेळगाव Live कडे उपलब्ध असून आम्ही बातमीसोबत नोटीशीची प्रत देखील अपलोड केली आहे तीही तुम्ही वाचू शकता.
1986 ध्वनी प्रदूषण कायद्याचं पालन सर्वांनी करणे अनिवार्य आहे या कायद्याचं उल्लंघन केल्यावर कारवाई केली जाईल असा इशारा देखील नोटीस द्वारे देण्यात आला आहे.
औद्योगिक क्षेत्र, व्यापारी क्षेत्र, सायलेंट झोन आणि रहिवाशी परिसरात किती आवाज असावा याबाबत नोटीशीत उल्लेख करण्यात आला आहे.