Wednesday, January 22, 2025

/

‘बेळगाव जुडो संघाला सर्वसाधारण विजेतेपद’

 belgaum

कर्नाटक जुडो असोसिएशनच्या वतीनं आयोजित कूटची भवन बंगळुरू येथे नुकत्याच पार पडलेल्या 40 व्या राज्यस्तरीय जुडो स्पर्धेत बेळगाव जुडो केंद्राने सर्वसाधारण विजेतेपद पटकावत घवघवीत यश संपादन केलं आहे.

या स्पर्धेत जुडो कोच रोहिणी पाटील व सहाययक कोच कुतुजा मुलतानी यांच्या नेतृत्वाखालील खेळाडूंनी सहभागी होत नेत्रदीपक यश मिळवले आहे.बेळगाव जुडो केंद्राच्या खेळाडूंनी 12 सुवर्ण,6 रौप्य तर 11 कांस्य अश्या एकूण 29 राज्य स्तरीय पदकांची लयलूट करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे.Judo

तीन वयोगटातील खेळाडूंत झालेली ही स्पर्धा मिनी वेट कॅटेगेरी 10 ते 12 वर्षे वयोगट, सब ज्युनियर कॅटेगेरी 12 ते 15 वर्षे आणि कॅडेट कॅटेगेरी 15 18 वर्षे अश्या गटात विभागल्या होत्या.

सब ज्युनियर गटात सुरज सावंत,कार्तिक पावसकर,अमृता नाईक,सानलीका नाईक,शगुप्ता वालीकर,आफ्रिन बानो,श्वेता यांनी तर कॅडेट कॅटगेरी गटात अरुण माळी,हरीश सतवाडी,ऐश्वर्या, रक्षिता कुमार,भूतरिका व्ही एन गोल्ड मेडल मिळवले

 

 

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.