बेळगाव येथील राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थलांतरित करू नये अशी मागणी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी आरोग्यमंत्री के सुधाकर यांच्याकडे केली आहे.
बेनके यांनी आरोग्य, कुटुंब कल्याण आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री के. सुधाकर यांची भेट घेत राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ कर्नाटक बंगलोरच्या प्रादेशिक केंद्राच्या निर्मितीबाबत निवेदन सादर केले.
बेळगाव उत्तर मतदारसंघातील रामतीर्थ नगर येथे राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रादेशिक केंद्र मंजूर करण्यात आले असून सर्व्हे क्र. 576, 577 आणि 578 मध्ये त्यासाठी 3600.00 चौ.मी. जागा मंजूर करण्यात आली आहे.
बेळगाव ही राज्याची दुसरी राजधानी असून बेळगाव गोवा आणि महाराष्ट्र राज्यांच्या सीमेवरील शहर असल्याने आपल्या जिल्ह्यासाठी वैद्यकीय शिक्षण खूप महत्त्वाचे आहे.
यासाठी आमदार बेनके यांनी राजीव गांधी विज्ञान विद्यापीठ स्थलांतरित करू नये कारण ते उच्च वैद्यकीय शिक्षण केवळ बेळगाव उत्तर मतदारसंघातील विद्यार्थ्यांनाच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मदत करेल असेही मागणीत म्हटले आहे.