बेंगलोर येथील पबल्स फिटनेसतर्फे बेंगलोर जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या सहकार्याने आयोजित ‘बाबूज क्लासिक -2022’ या राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेतील मानाचा बाबूज क्लासिक -2022 हा मानाचा किताब उडपीच्या नित्यानंद कोटीयन याने हस्तगत केला. त्याचप्रमाणे ‘बेस्ट पोझर’ हा किताब बेळगावच्या राजकुमार दुरगुडे याने मिळविला.
कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्सच्या मान्यतेने गेल्या रविवारी आंबेडकर मैदान, श्रीरामपूरम बेंगलोर येथे उपरोक्त भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. स्पर्धेतील मानाच्या ‘बाबूज क्लासिक -2022’ किताबासाठी बेळगावच्या विशाल चव्हाण आणि नित्यानंद कोटीयन यांच्यात चांगलीच चुरस निर्माण झाली होती.
मात्र अखेर नित्यानंद यांची सरशी झाली. विशाल चव्हाण याला फर्स्ट रनर अप अर्थात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर उडपीचा आनंद सवर्णा हा सेकंड रनर अप ठरला. या तिघांना अनुक्रमे 75000 रु., 35000 रु. आणि 20000 रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. बेस्ट पोझर किताब विजेत्या बेळगावच्या राजकुमार दुरगुडे याला 5000 रुपये आणि आकर्षक करंडक देऊन गौरविण्यात आले.
सदर स्पर्धा विविध आठ वजनी गटात घेण्यात आली आणि या प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेचा गटवार अंतिम निकाल पुढील प्रमाणे आहे.
55 किलो वजनी गट : 1) विठ्ठल जी चव्हाण (बागलकोट), 2) आकाश निगराणी (बेळगाव), 3) राजकुमार दुरगुडे (बेळगाव), 4) दर्शन जी. (चित्रदुर्ग), 5) नोयल प्रज्वल (मंगळूर). 60 किलो गट : 1) उमेश गणगणे (बेळगाव), 2) प्रेमकुमार सी. (शिमोगा), 3) हनुमंत (बेंगलोर), 4) दिलीप नायक (बेंगलोर). 65 किलो गट : 1) सुरेश एस. (धारवाड), 2) शरीफ ए. के. (बेंगलोर), 3) अल्बर्ट (बेंगलोर), 4) सागर सिंग (बेंगलोर), 5) फैजान (बेंगलोर). 70 किलो गट : 1) आनंद सुवर्णा (उडपी), 2) प्रताप कालकुंद्रीकर (बेळगाव), 3) श्रवणन एच. (बेंगलोर), 4) सुनील पाटील (बेळगाव), 5) किशोर के. पी. (बेंगलोर).
75 किलो वजनी गट :1) तपसकुमार नायक (चित्रदुर्ग), 2) रवीकुमार एस. (बेंगलोर), 3) आकाश रावळ (बेळगाव), 4) विनोद जी. के. (तुमकुर), 5) रवी गाडीवड्डर (बेळगाव). 80 किलो गट : 1) विशाल चव्हाण (बेळगाव), 2) केशव (बेंगलोर), 3) कार्तिक (बेंगलोर), 4) समीर खान (बेंगलोर), 5) जोय जीत (मंगळूर). 85 किलो गट : 1) नित्यानंद कोटियन (उडपी), 2) गजानन काकतीकर (बेळगाव), 3) संदीप बंगेरा (मंगळूर), 4) मंजू (शिमोगा), 5) के. श्रीनिवासमूर्ती (बेंगलोर). 85 किलो वरील वजनी गट :1) नवीन (बेंगलोर), 2) बबलू अजय (बेंगलोर), 3) अविनाश केएसआरटीसी (हासन), 4) गप्पी ए. (बेंगलोर).
टायटल विजेता : नित्यानंद कोटीयन, फर्स्ट रनर अप : विशाल चव्हाण, सेकंड रनर अप : आनंद सुवर्णा, बेस्ट पोझर : राजकुमार दुरगुडे. सदर राज्यस्तरीय स्पर्धा कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्स संघटनेचे अध्यक्ष ॲड. बी. रवींद्रनाथ राय, कार्याध्यक्ष निळकंठ, सरचिटणीस आंतरराष्ट्रीय पंच बेळगावचे अजित सिद्दण्णावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.