राज्यात नवीन 19 ईएसआय रुग्णालयं सुरू करण्याचा प्रस्ताव असून त्यापैकी एक हुक्केरी तालुक्यातील हत्तरगी येथे असणार आहे, अशी माहिती कामगार मंत्री शिवराम हेब्बार यांनी दिली आहे.
राज्यातील तालुक्यात विशेष करून ग्रामीण भागातील ईएसआय रुग्णालयं सुरू करण्याची योजना आहे. त्यासाठी राज्यातील 19 ठिकाणे निश्चित करण्यात आली असून त्यात बेळगाव जिल्ह्याचा समावेश आहे.
हत्तरगी येथे ईएसआय रुग्णालयाची निर्मिती केली जाणार आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गेल्या महिन्यात राज्याचा 2022 -23 सालचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी त्यांनी 19 ठिकाणी ईएसआय रुग्णालयाची निर्मिती करण्याची घोषणा केली होती.
त्यानुसार त्याला आता चालना मिळत आहे. कामगार खात्याने याबाबत स्वतंत्र अध्यादेश बजावला असून त्यात याबाबतचा उल्लेख असल्याचे कामगार मंत्री हेब्बार यांनी स्पष्ट केले आहे.