मागील दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने शहर आणि परिसराला झोडपून काढले आहे. या पडलेल्या पावसात अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहेत तर काहींचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील एका घरातील पत्रे उडून गेले होते. त्यांचे मोठे नुकसान झाले होते. याची पाहणी करण्यासाठी आमदार अनिल बेनके यांनी त्या कुटुंबीयांना भेट देऊन आश्वासन दिले आहे.
आमदार अनिल बेनके यांच्या मतदार संघातील अलारवाड येथील एका घराचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. यामुळेच त्यांनी तातडीने शनिवारी पडलेल्या घराची पाहणी करून नुकसानभरपाई तातडीने देऊ असे आश्वासन दिले आहे.
आमदार अनिल बेनके यांच्या कार्यक्षेत्रातील पडलेल्या घरांची पाहणी करून त्यांनी नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे. अलारवाड बरोबरच इतर परिसराची त्यांनी पाहणी केली आहे. या पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे तर विद्युत खांब कोसळून वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे त्यांनी पाहणी करून तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
मुसळधार पावसाने माझ्या मतदार संघातील काही घरांची पडझड झाली. अलारवाड आणि रामलिंगखिंड गल्लीतील पडझड झालेल्या घरांना भेट दिली.
कुटुंबांशी चर्चा केली आणि नुकसान झालेल्या मालमत्तेची तात्काळ भरपाई आणि पूरग्रस्त घरांच्या पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना ताशिलदार, सर्कल आणि पीडीओ यांना दिल्या. तसेच घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरत असल्याने सखल भागातील अडथळे दूर करण्याचे निर्देश कॉर्पोरेशन, स्मार्ट सिटी प्राधिकरणांना दिले आहेत.पावसाळ्यापूर्वी अडथळे दूर केले जातील याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.