मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सुप्रीम कोर्टात प्रलंबितसीमाप्रश्नाच्या खटल्यात विषयी सविस्तर चर्चा केली कशी या खटल्याला गती देता येईल याविषयी महाराष्ट्र सरकारने योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी केली.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते शनिवारी सीमा वासीयांचे आधारवड राहिलेले स्वर्गीय एन डी पाटील यांच्या पत्नी माई पाटील यांची भेट सदिच्छा यांची भेट घ्यायला कोल्हापूरला गेले असता त्याच ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आले असता त्यांची ही भेट घेतली.
शनिवारी दुपारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ कोल्हापूरला गेले होते ज्येष्ठ नेते स्वर्गीय एन डी पाटील यांच्या पत्नी माई पाटील यांची कोल्हापूर मुक्कामी भेट घेऊन सांत्वन केले.
त्यावेळी कोल्हापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संकल्प मेळाव्यास सहभागी होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर होते ते देखील माई पाटील यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आले होते त्याचवेळी समिती शिष्टमंडळाने पवार यांची भेट घेऊन सुप्रीम कोर्टातील खटला, वकील आणि इतर गोष्टींच्या पाठपुराव्या बाबत चर्चा केली.
यावेळी मध्यवर्ती समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, मराठा बँकेचे अध्यक्ष दिगंबर पवार,माजी एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, समितीचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी उपस्थित होते.