मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक जत्ती मठात पार पडली बेळगाव शहराच्या शिवजयंती उत्सवाला 103 वर्षे पूर्ण होत असून यावर्षी उत्साहाने शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष दीपक दळवी होते.
मध्यवर्ती शिवजयंती मंडळा कडून 2 मे रोजी सकाळी 7 धर्मवीर संभाजी चौकात विविध गड-किल्ल्यावर येणाऱ्या ज्योतींचा स्वागत करण्यात येणार आहे तर सकाळी नऊ वाजता नरगुंदकर भावे चौकातील मंडपात छत्रपती शिवराय यांनी यांच्या मूर्तीची विधिवत पूजन आरती करण्यात येणार आहे.सकाळी दहा वाजता शामाप्रसाद मुखर्जी रोड येथील मनपाच्या छत्रपती शिवाजी उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधीश मूर्तीची पूजा करण्यात येणार आहे.
बुधवारी चार मे रोजी चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे बेळगाव शहरांमध्ये संध्याकाळी पाच वाजता मध्यवर्ती मंडळाच्या शिवाजी महाराजांच्या पालखीचे पूजन करत चित्ररथ मिरवणुकीची सुरुवात होणार आहे. सदर मिरवणूक मारुती गल्ली हुतात्मा चौक रामदेव गल्ली संयुक्त महाराष्ट्र चौक ,समादेवी गल्ली,यंदे खुट, कॉलेज रोड धर्मवीर संभाजी चौक,किर्लोस्कर रोड,रामलिंग खिंड गल्ली, हेमू कलानी चौक मार्गे जाऊन कपिलेश्वर मंदिर रोड सांगता होणार आहे.त्यानंतर रविवारी 8 मे रोजी सकाळी 8 वाजता परंपरे प्रमाणे राजहंस गड चढणे उतरणे स्पर्धा घेण्यात येणार आहे.
या शिवाय मध्यवर्ती शिवजयंती मंडळा कडून बसवेश्वर जयंतीनिमित्त नरगुंदकर भावे चौकात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या मिरवणूकीचे स्वागत करण्यात येणार आहेअसे निर्णय जत्ती मठात झालेल्या बैठकीत घेण्यात आले.
बैठकीवेळी मध्यवर्ती शिवजयंती मंडळ अध्यक्ष दीपक दळवी प्रकाश मरगाळे, विकास कलघटगी शिवराज पाटील,राजू शेट्टी, राजू मरवे महादेव पाटील ,राजू शेट्टी,गणेश दद्दीकर, शिवाजी मंडोळकर रणजित चव्हाण पाटील आदी उपस्थित होते.
बैठकीवेळी प्रास्ताविक आणि स्वागत शिवराज पाटील यांनी केले जन संपर्क प्रमुख विकास विकास कलघटगी नवीन कार्यकारी मंडळाचे वाचन केले.
यावेळी बोलताना प्रकाश मरगाळे यांनी बेळगावच्या शिवजयंती उत्सवाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने यावर्षी परंपरे प्रमाणे नेमकं कोणत्या विशेष आयोजन करण्यात येईल मिरवणूक कशी ऐतिहासिक करता येईल त्याबद्दल एक विशेष बैठक आयोजित करण्याचा उद्देश बोलून दाखवला तर माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी चित्ररथ महामंडळ आणि मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ यांनी समन्वय साधून बेळगावच्या जनतेला चांगल्या पद्धतीने ऐतिहासिक देखावे कसे दाखवता येईल यासाठी कार्य करा अश्या सूचना मांडल्या.राजू शेट्टी म्हणाले की यंदाच्या चित्ररथ मिरवणुकीत 70 चित्ररथ सहभागी होणार असल्याचे सांगितले.गेली काही वर्षे कोरोना आणि इतर कारणामुळे मिरवणूक झाली नसल्याने तरुण युवकांचा सहभाग वाढणार असून डॉल्बीला पूर्णपणे फाटा देण्यात यावा असे आवाहन केलं.