Tuesday, May 7, 2024

/

‘वेणूग्रामात अवतरली अयोध्या नगरी’

 belgaum

ढोल ताशाचा गजर,डॉल्बीचा दणदणाट,युवकांच्या हातात भगवे झेंडे,भगवेमय वातावरण,प्रभू राम चंद्रांचे चित्ररथ,लहान मुलांचे लेझीम पथक,मल्लखांबची प्रात्यक्षिके यासह हजारोच्या संख्येने उत्साहाने भारलेले तरुण,अवघी अयोध्या नगरीचं वेणू ग्राम मध्ये असेच काही चित्र श्री रामसेना हिंदुस्थान यांच्या वतीने आयोजित राम नवमी निमित्त काढलेल्या शोभायात्रेत होते.यानिमित्ताने बेळगाव नगरी राममय झाली होती.

रविवारी सायंकाळी धन्यवाद यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्याना मधुन शोभा यात्रेला सुरुवात झाली होती शोभायात्रेमध्ये प्रभू रामचंद्र ची पुष्प अलंकारीत बपालखी सर्वात पुढे होती त्यामागोमाग महाराष्ट्रातून आलेले हलगी पथक मिरवणुकीची शोभा वाढवत होते.हजारो तरुण डॉल्बीच्या दणदणाटवर थिरकत होते. शाहूनगर येथील युवकांनी थर्माकोल वर बनवलेले अयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृती लक्षवेधी ठरली होती.

याशिवाय लहान मुले लेझीम आणि मल्लखांब करून शोभायात्रेत अनेकांचे लक्ष वेधून घेत होते.डॉल्बी लावलेली लाईटची नवीन टेक्निक चित्रफिती वरचे छत्रपती शिवाजी महाराज खास आकर्षण बनले होते.Ram navami

 belgaum

श्री राम हनुमान आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचाही चित्ररथ लक्ष वेधी बनला होता.डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानातून सुरू झालेली शोभायात्रा कित्तूर चन्नम्मा सर्कल कॉलेज रोड धर्मवीर संभाजी सर्कल किर्लोस्कर रोड रामलिंग खिंड गल्ली ते टिळक चौक पर्यंत पोहोचली आणि त्याची सांगता झाली.

गेली दोन वर्ष कोरोनामुळे रामनवमी निमित्त शोभायात्रा काढण्यात आली नव्हती मात्र यावेळी कोरोना नष्ट झाल्याने मोठ्या उत्साहात रामनवमीची पारंपरिक शोभायात्रा काढण्यात आली त्याला बेळगावकर जनतेने अभूतपूर्व प्रतिसाद दिला.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.