Sunday, April 21, 2024

/

मध्यवर्ती शिवजयंती मंडळाची पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक

 belgaum

मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी खडे बाजार ए सी पी ए चंद्रप्पा यांची भेट घेऊन तातडीची बैठक करत शिवजयंती मिरवणूक की संदर्भात चर्चा केली केली आगामी दोन मे रोजी बेळगावात शिवजयंतीची मिरवणूक आयोजन करण्यात आले आहे दोन मे रोजी सकाळी नऊ वाजता चौकात शिवजयंती मध्यवर्ती मंडळाच्या पालखीचे पूजन करण्यात येणार आहे.

त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात येणार असून दोन मे रोजी सायंकाळी सहा वाजता मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजता मारुती गल्ली मारुती मंदिर येथे पालखीचे पूजन करून मिरवणुकीची सुरुवात करण्यात येणार आहे.

शिवजयंती उत्सव अगदी उत्साहात साजरा करा पण मिरवणुकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन चंद्रप्पा यांनी यावेळी मध्यवर्ती शिवजयंती मंडळाला केले.Police meeting

शांततेत शिवजयंती उत्सव साजरा करण्या संदर्भात पोलीस खात्याच्या वतीने सभा घेतली जाणार असल्याचे यावेळी पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी सांगितले.

बसव जयंती रमजान आणि शिवजयंती हे तिन्ही सण एकाच वेळी आल्याने शहरातील सर्व समाजाने शांततेत व उत्साहात जबाबदारीने साजरे करावे असे आवाहन पोलिसांनी केले.आजच्या बैठकीस प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, रणजित चव्हाण पाटील, विकास कलघटगी यांनी चर्चेत भाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.