मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाची बैठक रविवार दिनांक 10 एप्रिल रोजी बोलावण्यात आली आहे बेळगावच्या पारंपरिक शिवजयंती उत्सव आला संपूर्ण देशात एक महत्त्व आहे पण कोरोनामुळे गेली दोन वर्षे शिवजयंती उत्सवानिमित्त निघणाऱ्या चित्ररथ मिरवणुक खंडित पडली होती पण आता जनजीवन पूर्वपदावर आल्याने शिवप्रेमी उत्साह संचारला आहे.
रामलिंग खिंड गल्ली येथील जत्ती मठ देवस्थान येथे सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या बैठकीस शहर आणि उपनगरातील सर्व शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शिव प्रेमीनी उपस्थित राहावे असे आवाहन मध्यवर्ती शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे.
बेळगाव शहरात शिवजयंती आणि गणेशोत्सव महाराष्ट्राच्या धर्तीवर उत्साहाने साजरा केला जातो त्यामुळे गणपती व शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला खूप महत्त्व आहे त्यातच शिवजयंतीची मिरवणूक तर अतिउत्साही असते शिवजन्मोत्सव पासून शिवराज्याभिषेक पर्यंत सर्व हलते देखावे मंडळ सादर करत असतात.
बेळगाव शहरातील रस्त्यावर शिव सृष्टीचं अवतरल्याचा दृश्य त्या दिवशी असते त्यासाठी मध्यवर्ती शिवजयंती महामंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा केली जाणार आहे.