बेळगाव जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या बाबतीत नेहमी आपुलकीने वक्तव्य करणारे रमेश जारकीहोळी यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली आहे. उत्तर कर्नाटक मध्ये बेळगाव जिल्ह्यातील बिदर जिल्ह्यात मराठा आणि मराठी भाषिकांची संख्या भरपूर आहे या समाजाला प्रतिनिधित्व देण्याची गरज आहे.
बेळगाव जिल्ह्यामध्ये तर मराठा समाज बांधवांच्या मतदारांची संख्या निर्णायक आहे अनेक मतदार संघामध्ये मराठा डॉमिनेटिंग आहेत ज्या मतदार क्षेत्रामध्ये मराठा मतदार अधिक आहेत त्या ठिकाणी आगामी निवडणुकांमध्ये भाजपने मराठा समाजाला उमेदवारी द्यावी अशी मागणी रमेश जारकीहोळी यांनी राज्य प्रभारी अरुण सिंह यांच्याकडे केली आहे.
मंगळवारी बेळगाव येथील संकम हॉटेलमध्ये दोन दिवसीय बेळगाव जिल्हा भाजपाचा कोअर कमिटीची बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये रमेश जारकीहोळी यांनी मागणी केली. बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाचा बाबतीत बोलताना जारकीहोळी यांनी जिल्हा विभाजनाचा बाबत उमेश कत्ती यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे या वक्तव्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपला फटका बसायची शक्यता आहे त्यामुळे हायकमांडने या विषयात हस्तक्षेप करून उमेश कत्ती यांना कडक सूचना कराव्यात अशी देखील मागणी त्यांनी केली.
एकीकडे रमेश जारकीहोळी यांनी जिल्हा विभाजन आणि मराठा समाजाला प्रतिनिधित्व देण्याची मागणी करत असताना दुसरीकडे कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये येथे हिंडलगा येथे राहणाऱ्या संतोष पाटील नामक ठेकेदारांने आत्महत्या केल्याच्या घटनेचे पडसाद उमटले.
ग्रामीण विकास मंत्री ईश्वराप्पा यांनी 40 टक्के कमिशन मागण्याचा आरोप करत सुसाईड नोट लिहीत मृत्युला मंत्र्यांना जबाबदार धरत उडुपी येथे आत्महत्या केली होती.स्थानिक भाजप मधल्या समस्यांबद्दल कोअर कमिटी बैठकीत चर्चा होत असताना अचानक पणे ठेकेदाराच्या आत्महत्येबाबत देखील जोरदारपणे या बैठकीत चर्चा झाली.