बेळगाव च्या खासदार मंगला अंगडी यांनी बेळगाव विमानतळाहून कार्गो सेवे सह नवीन ठिकाणी विमानसेवा सुरु करा अशी मागणी लोकसभेत केली आहे.
गुरुवारी संसदेत सुरू असलेल्या उन्हाळी अधिवेशनात खासदार मंगला अंगडी यानी खूप दिवसापासून प्रलंबित असलेली कार्गो विमानसेवा आणि बेळगाव हुन नवीन हवाई रुट्स सुरु करा अशी मागणी विमान उड्डाण मंत्रालयाकडे केली आहे.
नियम 377 नुसार लोकसभेत मुद्दा मांडताना मंगला अंगडी यांनी बेळगाव शहरातून बेळगाव बंगळुरू सकाळची फ्लाईट सुरू करावी यासह बेळगाव शहराला गोरखपूर, वाराणसी,शिरडी,दरभंगा आणि गया या शहरांना विमान सेवेनी जोडावे अशी मागणी केली.
स्वातंत्र्य पूर्व काळापासून बेळगावचे विमानतळ अस्तित्वात आहे सध्या शिक्षण क्षेत्रात शहर पुढे आहे व्ही टी यु आर सी यु सारखी विश्वविद्यालये, अनेक इंजिनिअरिंग आणि मेडिकल,डेंटल कॉलेजीस आहेत संरक्षण खात्याची महत्वपूर्ण कार्यालये आहेत त्यामुळे नवीन मार्गावर विमानसेवा सुरू करावी असे अंगडी यांनी म्हटलं आहे.
गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर शहर असून उत्तर कर्नाटकातील महत्वपूर्ण केंद्र बनले आहे या ठिकाणी कार्गो एअर सेवा सुरू झाली पाहिजे याविषयी विमान उड्डाण खात्याने लक्ष घालावं असेही खासदारांना नमूद केलं.