Thursday, December 26, 2024

/

कुसनाळला मूलभूत सुविधांसाठी 10 कोटी

 belgaum

कृष्णा नदीला महापुरानंतर बुडणार्‍या कुसनाळ गावचे स्थलांतर केले आहे. येथील मूलभूत सुविधांसाठी 10 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून, कामाला प्रारंभ झाला. याचा शुभारंभ कागवाडचे आ. व माजी मंत्री श्रीमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

कृष्णा नदीला महापूर आल्यानंतर बुडणारे कुसनाळ गावचे स्थलांतर व्हावे, अशी अपेक्षा आ. श्रीमंत पाटील यांनी यापूर्वीच राज्य शासनाकडे मांडली होती. त्याची दखल घेऊन या गवाचे शासनाने यासाठी गावापासून काही अंतरावर कुसनाळच्या स्थलांतरासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. आता येथे मूलभूत सुविधांची गरज असल्याने त्यासाठी आमदारांकडून पाठपुरावा सुरू होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून पुनर्वसन परिसराला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने 10 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे मंगळवारी येथील विकासकामांना आ. श्रीमंत पाटील यांच्या हस्ते प्रारंभ झाला. या कामाला प्रारंभ करण्यापूर्वी आ. पाटील यांनी येथील ग्रामदेवता महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले.
यावेळी कागवाडचे तहसीलदार राजेश बुर्ली, उपनिरीक्षक बी. एम. रबकवी, पाटबंधारे खात्याचे सहायक कार्यकारी अभियंता प्रवीण हुनशीकट्टी, एन. सी. पवार, विनय कोळी, उगार बीके पंचायतीचे अध्यक्ष आण्णागौडा शीतल पाटील, कुसनाळ व मुळवाड गावचे प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.Shrimant patil

कुसनाळला घराचे नुकसान झालेल्यांना मदत

वादळी पावसामुळे घरावर झाडे पडून व पत्रे नुकसान झालेल्या कुसनाळ (ता. कागवाड) येथील पाचजणांना आर्थिक मदत दिली. श्रीमंत पाटील फाऊंडेशनच्यावतीने कागवाडचे आ. व माजी मंत्री श्रीमंत पाटील यांनी प्रत्येकाकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
कागवाड मतदार संघातील अनेक गावांमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. अनेक घरांवर झाडे पडून व सोसाट्याच्या वार्‍यामुळे घरावरील पत्रे उडून गेले आहेत. कुसनाळ येथील पाच घरांचे नुकसान झाल्याची माहिती आ. श्रीमंत पाटील यांना समजली. त्यांनी तातडीने या गावाला भेट देऊन श्रीमंत पाटील फाऊंडेशनतर्फे सर्वांना आर्थिक मदत दिली. यामध्ये श्रीमती महादेवी संगाप्पा मादर, महादेवी शरणाप्पा मादर, सुवर्णा कांबळे, नागव्वा शरणाप्पा मादर व चिदानंद कांबळे यांचा समावेश आहे. या सर्वांना धीर देताना काहीही अडचण आल्यास आपल्याशी व आपल्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याची विनंती त्यांनी या कुटुंबियांना केली. शासनाकडूनही मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी तहसीलदार राजेश बुर्ली, उपनिरीक्षक बी. एम. रबकवी, पाटबंधारे खात्याचे सहायक कार्यकारी अभियंता प्रवीण हुनशीकट्टी, स्थानिक नेते जयपाल यरंडोले, अमित पाटील, विजय खन्नीकुडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.