जर एखाद्याच्या नावाचे आणि प्रोफाईल वापरून फेक अकाउंट तयार करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास ते बनावट फेसबुक अकाउंट डिलीट करण्यासाठी कोणती पावले उचलावीत यासंदर्भात बेळगाव शहर सायबर क्राईम पोलिसांनी माहिती जाहीर केली आहे.
जर तुमच्या अथवा तुमच्या मित्राच्या नावाचा आणि प्रोफाईलचा वापर करून खोटे खाते अर्थात फेक अकाउंट निर्माण करण्यात आले असल्याचे निदर्शनास आल्यास फेसबूकवरील ते अकाउंट डिलीट म्हणजे बंद करण्यासाठी पुढील पावले उचलावीत.
1) प्रथम त्या बनावट फेसबुक अकाउंट प्रोफाईल पेजवर जा, 2) ॲड फ्रेंड आणि मेसेज टॅबच्या बाजूला असलेल्या तीन टिंब अर्थात डॉट्सवर (…) क्लिक करा, 3) क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्च प्रोफाइल, फाईंड सपोर्ट ऑर रिपोर्ट प्रोफाइल आणि ब्लॉक, असे तीन ऑप्शन दिसून येतील, 4) यापैकी दुसरा ऑप्शन म्हणजे ‘फाईंड सपोर्ट ऑर रिपोर्ट प्रोफाइल’ क्लिक करा.
5) क्लिक केल्यानंतर ‘रिपोर्ट’ नावाचा पॉप-अप मेसेज बॉक्स ओपन होईल. त्यामधील ‘प्रीटेंडिंग टू बी समवन’ हा पहिला ऑप्शन निवडा, 6) ऑप्शन निवडल्यानंतर ‘हू आर दे प्रीटेंड्स टू बी’ या खाली तीन प्रश्न दिसतील, 7) त्यापैकी ‘मी’ (जर प्रोफाइल तुमच्या नावे असेल तर) अथवा ‘फ्रेंड’ (जर फेक अकाउंट तुमच्या फेसबुक मित्राच्या नावावर असेल तर) यावर क्लिक करा,
8) त्यानंतर ‘नेक्स्ट’ क्लिक करा. नंतर कोम्बो बॉक्सवर टिक करा आणि ‘रिपोर्ट’ सिलेक्ट करून क्लिक करा त्यानंतर ‘नेक्स्ट’ पुन्हा ‘नेक्स्ट’ क्लिक करा. या सर्व पायऱ्यांची अंमलबजावणी केल्यानंतर बनावट अर्थात फेक अकाउंट प्रोफाइल 5 -10 मिनिटात डिलीट होईल. तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सायबर क्राईम पोलिस बेळगाव शहर यांनी केले आहे.