Friday, December 27, 2024

/

आजी आजोबांनी लुटला आनंद

 belgaum

शांताई वृद्धाश्रमातील आजी – आजोबांना विरंगुळा मिळावा याकरिता शांताई चे विजय मोरे यांनी आजी – आजोबांना मी वसंतराव हा चित्रपट दाखविला . येथील आयनॉक्स चित्रपट गृहात आजी – आजोबांनी मी वसंतराव हा चित्रपट पाहून मनमुराद आनंद लुटला .

यावेळी जवळपास 40 ते 45 आजी – आजोबांनी मी वसंतराव हा चित्रपट पाहण्यासाठी उपस्थिती लावली होती . यावेळी सर्व लोकसेवा फाउंडेशन चे अध्यक्ष वीरेश हिरेमठ यांनी देखील आजी – आजोबांच्या सुरक्षिततेसाठी मास्क आणले होते .Old ages womens

यावेळी वीरेश हिरेमठ यांनी स्वतः आजी – आजोबांना मास्क देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली . याप्रसंगी शांताईचे कार्याध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच माजी महापौर विजय मोरे यांनी मी वसंतराव या चित्रपटाबद्दल माहिती देऊन कलाकारांनी कशाप्रकारे काम केले आहे हे सांगितले .

यावेळी शांताईचे आजी आजोबांसह इतर कर्मचारी आणि सदस्य संख्येने उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.