काँग्रेसने आपल्या सत्तेमध्ये म्हादई आंदोलनकर्त्यांवर तुरुंगात ठोकून हल्ला केला होता. या प्रश्नावर आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार आता काँग्रेसच्या नेत्यांना राहिलेला नाही, अशी टीका जल संपदामंत्री गोविंद कारजोळ यांनी केली.
मंगळवारी बेळगावात पत्रकारांशी बोलताना मंत्री कारजोळ म्हणाले, ‘महादाईसाठी मी आणि मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याशी चर्चा केली आहे. म्हादई योजनेच्या कामात आम्हाला स्वायत्तता देण्यास सांगितले आहे. ते म्हणाले की, राज्याचा फ्री व्हायबिलिटी रिपोर्ट मंजूर करण्याचे आश्वासन दिले आहे.
राज्यात काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी म्हादई योजनेसाठी आंदोलन करणाऱ्या ७८० शेतकऱ्यांना त्यांच्या घरात घुसून मारहाण करून तुरुंगात डांबून ठेवले होते. महिलांच्या अंगावरील कपडेही फाडले होते. त्यामुळे काँग्रेसला या प्रश्नावर आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही.
मंत्री कारजोळ म्हणाले की, म्हादई, मेकेदातू, कृष्णा पाणी प्रश्न आमचे सरकार सोडवणार आहे.सरकार बोलते म्हणून संपूर्ण म्हादई योजना लागू होणार की केवळ आश्वासनच ठरणार हे पाहावं लागेल.