दमन गुजरात येथे आयोजित जायन्ट्स इंटरनॅशनलच्या 46 व्या जागतिक अधिवेशनामध्ये उल्लेखनीय कार्याबद्दल बेळगाव मेन जायन्ट्स फेडरेशनचे सचिव अनंत लाड यांचा आज खास पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
दमण गुजरात येथे काल शुक्रवारपासून जायन्ट्स इंटरनॅशनलच्या 46 व्या जागतिक अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या रविवार 1 मे 2022 पर्यंत सलग तीन दिवस हे अधिवेशन चालणार आहे.
या अधिवेशनाचे आज शनिवारी रीतसर उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दिव -दमणचे प्रशासक प्रफुल्ल पटेल आणि जायन्ट्स वर्ल्ड चेअरपर्सन शायना एन. सी. उपस्थित होते.
उद्घाटन समारंभाप्रसंगी उल्लेखनीय कार्याबद्दल बेळगाव मेन जायन्ट्स फेडरेशनचे सचिव अनंत लाड यांचा प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते खास पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी देश-विदेशातील जायन्ट्स फेडरेशनचे पदाधिकारी तसेच मान्यवर निमंत्रित उपस्थित होते