Saturday, July 27, 2024

/

बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त उत्कृष्ट स्केटिंगपटूंचा गौरव

 belgaum

बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त स्केटिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या स्केटिंगपटूं आणि स्केटिंग प्रशिक्षकांचा सन्मान करण्यात आला. गोवावेस येथील स्केटिंग रिंकवर या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अपटेकचे बेळगाव विभागाचे पार्टनर विनोद बामणे, सौ. ज्योती बामणे, न्यायाधीश कमलकिशोर जोशी, मधुकर बागेवाडी, जायंट्स परिवाराचे राजू माळवडे, सामाजिक कार्यकर्ते रमेश परदेशी, स्केटिंग प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर, एम स्टाईल डान्स अकॅडमीचे संचालक महेश जाधव याप्रसंगी उपस्थित होते.

प्रारंभी आंतरराष्ट्रीय नृत्यांगना प्रेरणा गोनबरे, नृत्यांगना देवेन बामणे, विशाखा फुलवाले आणि सहकाऱ्यांनी सामुहिक नृत्य सादर करून कार्यक्रमाला चालना दिली. यानंतर शर्वरी दड्डीकर हिने बासरीवादन केले.Skating

यानंतर स्केटिंग क्षेत्रात राज्य स्तरावर उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या स्केटिंगपटूं तसेच उत्कृष्ट स्केटिंगपटू घडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या स्केटिंग प्रशिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. अमित वगराळी तसेच आंतरराष्ट्रीय नृत्यांगना प्रेरणा गोनबरे, नृत्यांगना देवेन बामणे, विशाखा फुलवाले आणि ईतर नृत्य कलाकारांचाही याप्रसंगी सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना ज्योती बामणे यांनी, बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीच्या कार्याचे कौतुक केले तसेच स्केटिंगपटूंनी प्रामाणिक प्रयत्न आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवून अकादमीबरोबरच बेळगावचे नाव लौकिक करावे असे म्हटले.
स्केटिंग प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर यांनी आपल्या भाषणातून स्केटिंगपटूंना प्रेरित केले.

सुर्यकांत हिंडलगेकर,योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, सक्षम जाधव, अनुष्का शंकरगौडा, गणेश दड्डीकर, प्रकाश पाटील, नितीन कुदळे, सतीश पाटील, राहुल नेमण्णवर, रोहन कोकणे, रोशन नरगोडी, कृतेश भोसले, इमरान शेख यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीचे पालक, एम स्टाईल डान्स आणि फिटनेस अकादमीचे सदस्य, नृत्यांगना आणि स्केटिंगपटू आणि पालक उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.