उत्तर कर्नाटका मध्ये सध्या बेळगाव आणि हुबळी ही दोन प्रादेशिक विमानतळ 100 किलोमीटरच्या अंतरावर कार्यरत आहेत अशा परिस्थितीमध्ये या भागातून आंतराष्ट्रीय उड्डाणे व्हावीत या दृष्टिकोनातून उद्योगमंत्री मुरुगेश निराणी यांनी उत्तर कर्नाटकासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार करा अशी मागणी केली आहे.
बेळगाव आणि हुबळी आंतर्देशीय विमानतळ सक्रीय आहेत मात्र या भागासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाची उणीव आहे यासाठी कित्तूर जवळ आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्माण करा अशी मागणी उद्योग मंत्री निराणी यांनी केली आहे.
खासगी निवेशकाना मी वैयक्तिक रित्या बोललो कित्तूर जवळ आपण गुंतवणूक करावी अशीही मागणी केलेली आहे त्यासाठी अनेकांनी होकार देखील दर्शवला आहे.
कित्तुर हे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उपयुक्त असणार आहे कारण हुबळी बेळगाव जवळपास सम अंतरावर आहे आणि कारवार नाविक दलाचे तळ देखील जवळ आहे असेही निराणी म्हणाले.