कर्नाटक राज्यातील नामांकित डॉ रेड्डीज लॅबने ‘2 डीजी’ हे आपले कोरोना प्रतिबंधक घरगुती जालीम औषध सरकार आणि खाजगी हॉस्पिटल्ससाठी उपलब्ध आहे अशी घोषणा करताच कोरोनाच्या तिसऱ्या लाटे पूर्वीच कर्नाटक सरकारने त्या औषधाचा साठा करण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.
बेंगलोर येथे पत्रकारांशी बोलताना आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर म्हणाले की, तज्ञांनी डॉ. रेड्डीज लॅबने बनविलेली आणि डीआरडीओ यांनी विकसित केलेले घरगुती ‘2 डीजी’ औषध हे कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी वापरण्यास योग्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. त्यामुळे संभाव्य चौथ्या लाटेपूर्वी या औषधाची खरेदी करण्याचा विचार सरकार करत आहे, असे मंत्र्यांनी सांगितले.
कर्नाटकातील कोरोना परिस्थितीबद्दल बोलताना राज्यात कोरोना मुक्त होणाऱ्यांची टक्केवारी 95 टक्के इतकी आहे. त्याचप्रमाणे पॉझिटिव्हिटी रेट 2.62 टक्के असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील फक्त कोडगु, म्हैसूर, मंगळूर आणि हासन जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट जास्त म्हणजे 5 टक्के आहे.
कोरोना चांचणीच्या क्रमवारीत कर्नाटक देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही राज्य या बाबतीत पहिल्या दोन क्रमांकावर आहेत. आतापर्यंत राज्यात 3 कोटी 36 लाख 73 हजार 395 कोरोना चांचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ सुधाकर यांनी दिली.
राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये अलीकडच्या काळात कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही. एकंदर मृत्यूचा दर देखील अत्यंत कमी झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.