बेळगाव जिल्ह्यामध्ये भाजपात असलेला अंतर्गत हा हायकमांडला देखील नवीन नाही अनेकदा सूचना करून देखील भाजपामध्ये दोन गट सक्रिय झाले आहेत. विधानपरिषद निकालानंतर तर पक्षात आलबेल नाही हेच वातावरण असल्याची चर्चा आहे कत्ती विरुद्ध जारकीहोळी असा संघर्ष सध्या भाजपात रंगू लागला आहे. भविष्यात भाजपा पक्षाला बेळगाव जिल्हा मधला डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी यावर चर्चा करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते बेळगावात येणार आहेत.
भाजप प्रभारी अरुण सिंह हे दोन दिवस बेळगावात राहणार असून बेळगावात राहून ते सर्व माहिती संग्रहित करून हायकमांडला कळवणार आहेत .अरुण सिंह यांच्याकडे रमेश जारकीहोळी यांच्या समर्थनात आणि विरोधात दोन्ही गट तक्रार करायला तयारअसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
मंगळवारपासून बेळगाव येथील संकम हॉटेल मध्ये बेळगाव जिल्हा भाजपची दोन दिवस चिंतन बैठक होणार आहे या बैठकीला बीएस येडीयुरप्पा यांच्या सह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत भविष्यात भाजपने कोणती रणनीती आखावी याबाबत मंथन या बैठकीत होणार आहे.
आगामी काळात मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारामध्ये रमेश जारकीहोळी यांना सामावून घ्यावं की नाही याबद्दल ते अनेकांशी चर्चा करणार असल्याची शक्यता असून जारकीहोळी यांना मंत्री केल्यास आणि न केल्यास बेळगावात भाजपावर काय परिणाम होतील याचाही अभ्यास ते दोन दिवस बेळगावात राहून करणार असल्याचे सूत्रांकडून कळते.
एकीकडे बेळगाव जिल्ह्यातील सर्व लिंगायत नेते एकत्र झाले आहेत तर दुसरीकडे जारकीहोळी बंधूंचा जोरदार लॉबिंग आहे त्यामुळे प्रभारी अरुण सिंह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा तल्या अंतर्गत घडामोडीं वाढल्या आहेत.बेळगाव जिल्ह्यामधल्या माजी आमदार,आमदार मंत्री आणि भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी यांच्याशी वैयक्तिक रित्या भेटून चर्चा केल्यानंतरच आपला अहवाल हायकमांडला देणार आहेत.
दोन दिवस होणाऱ्या या भाजपाच्या बैठकीत माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या राजकीय भविष्याबद्दल तर चर्चा होणारच आहे याशिवाय लक्ष्मण सवदी आणि उमेश कत्ती यांची वैयक्तिक प्रतिष्ठा पणाला लागणार आहे अशीही माहितीआहे.भाजपच्या या बैठकीत नंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार की जसा आहे तसा सरकार पुढे चालणार हे देखील ठरणार आहे असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
रमेश जारकीहोळी यांना मंत्रीपद दिल्यास बेळगावमध्ये भाजपला अधिक बळकटी मिळेल भाजपला लागतो तेव्हा ते मोठा निधी उपलब्ध करून देत असतात जिल्ह्यात फेरफटका मारून भाजपचा उमेदवार विजयी करत असतात ह्या गोष्टी अरुण सिंह यांना समजाऊन कोण सांगणार ? की त्यांच्या विरोधात लॉबिंग होणार त्यांना मंत्रिपद मिळणार की नाही? याकडेच सर्व राजकीय अभ्यासकांचे लक्ष लागून राहिले आहे.