Monday, April 29, 2024

/

मुख्यमंत्र्यांचे उद्या बेळगावात आगमन

 belgaum

राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे उद्या गुरुवार दि. 28 एप्रिल रोजी बेळगाव दौऱ्यावर येत असून शहरातील जनकल्याण ट्रस्टतर्फे आयोजित जगन्नाथराव जोशी जन्मशताब्दी स्मारक भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत.

जगन्नाथराव जोशी जन्मशताब्दी स्मारक भवनाचा भूमिपूजन कार्यक्रम उद्या गुरुवारी दुपारी 3:30 वाजता न्यू गुडशेड रोड, शास्त्रीनगर परिसरात होणार आहे. जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास ऊर्जामंत्री व्ही. सुनीलकुमार, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सी. सी. पाटील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ. भा. व्यवस्था प्रमुख मंगेश भेंडे उपस्थित राहणार आहेत.

सदर कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे उद्या दुपारी 2:30 वाजता बेळगावात आगमन होणार आहे.

 belgaum

भूमिपूजनानंतर सायंकाळी 5:40 वाजता ते विमानाने बेंगलोरला रवाना होणार आहेत. भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांनी सक्तीने फेसमास्क परिधान करावा, असे आवाहन जनकल्याण ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.