बेळगाव पोलीस खात्यातील तीन एनकाऊंटर स्पेशालिस्ट पोलिस अधिकाऱ्यांपैकी एक असलेल्या शंकर मारीहाळ यांची पोलीस अधीक्षकपदी (एसपी) पदोन्नती झाली आहे.
शंकर मारीहाळ यांची हेस्कॉम व्हीजिलेंस स्कोड पोलीस अधीक्षकपदी पदोन्नतीवर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपालांच्या आदेशावरून सरकारची सचिव राजेश सुळीकेरी यांनी हा आदेश बजावला आहे.
कांही वर्षे बेळगावात सेवा बजावलेले शंकर मारीहाळ हे सध्या हावेरी जिल्ह्यातील हावेरी उपविभागाचे डीवायएसपी म्हणून काम पहात आहेत. यापूर्वी त्यांनी बेळगाव मार्केट पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य पार पाडले आहे.
शितल चौगुले बलात्कार आणि खून प्रकरणातील मुख्य आरोपी उडपी येथे दडून बसलेला बेळगावचा सुपारी किलर आणि गॅंगस्टर नराधम प्रवीण शिंत्रे याचे एन्काऊंटर करणाऱ्या तिघा एनकाऊंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकाऱ्यांमध्ये शंकर मारीहाळ यांचा समावेश होता.
नारायण बरमणी आणि महांतेश्वर जिद्दी हे त्यांचे उर्वरित दोन सहकारी अधिकारी होते. गणेशपूर येथील ज्या ‘राजदीप’ बंगल्यामध्ये शितल चौगुले हिचा बलात्कार करून खून करण्यात आला होता, त्या बंगल्यामध्ये प्रवीण शिंदे याचा एन्काउंटर झाला होता.