Saturday, April 27, 2024

/

येळ्ळूर पंचायतीने केल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे या मागण्या

 belgaum

येळ्ळूर गावात दारू बंदी करा आणि गावच्या एक कि.मी. परिसराची नोंद गावठाण मध्ये करा अशी मागणी येळ्ळूर ग्राम पंचायतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी येळ्ळूर ग्राम पंचायतीला धावती भेट देऊन विकास कामांची पहाणी केली त्यावेळी त्यांना निवेदन देत या मागण्या केल्या आहेत.

हिरेमठ यांना येळ्ळूर ग्राम पंचायती कडून ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले,यावेळी जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी पंचायतचे नूतनीकरण केलेल्या कामाची पाहणी करून कामाचे कौतुक केले व पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी येळ्ळूर ग्राम पंचायतच्या वतीनं निवेदन देण्यात आली.Yellur gp

 belgaum

सर्व प्रथम गावाच्या सभोवताली एक किलोमीटर पर्यंत गावठाण म्हणून नोंद करावी असे निवेदन देण्यात आले तसेच गावातील दारू विक्री बंद करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी येळ्ळूर ग्राम पंचायत उपाध्यक्ष लक्ष्मी मासेकर, सदस्य प्रमोद पाटील,रमेश मेणसे,परशराम परीट, राकेश परीट ,दयानंद उघाडे, शशीकांत धुळजी,कल्लाप्पा मेलगे,राजू डोंन्यांनावर, अरविंद पाटील,विलास बेडरे,रूपा पुन्यानावर,सुवर्णा बीजगरकर,सोनाली येळ्ळूरकर,मनीषा घाडी, वनिता परीट,रुक्मिणी नाईक,पीडिओ अरुण नाईक,सेक्रेटरी सदानंद मराठे,तलाठी मयूर मासेकर,कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.