येळ्ळूर येथील श्री चांगळेश्वरी मंदिर विश्वस्त मंडळ आणि कार्यकारिणीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत श्री चांगळेश्वरी देवी, श्री कलमेश्वर, श्री महालक्ष्मी वाढदिवस आणि महाराष्ट्र कुस्ती मैदान असा संयुक्त यात्रोत्सव कार्यक्रम निश्चित करून जाहीर करण्यात आला.
येळ्ळूर येथील श्री चांगळेश्वरी मंदिर विश्वस्त मंडळ आणि कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नारायण कंग्राळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीचे प्रास्ताविक वाय. सी. इंगळे यांनी केले. बैठकीमध्ये श्री चांगळेश्वरी, श्री कलमेश्वर, श्री महालक्ष्मी यात्रोत्सवासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
सदर चर्चेअंती संयुक्त यात्रोत्सवाचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे ठरविण्यात आला. सोमवार दि. 25 एप्रिल 2022 रोजी आंबील गाडे, मंगळवार दि. 26 एप्रिल रोजी इंगळ्या कार्यक्रम, बुधवार दि. 27 एप्रिल रोजी श्री महालक्ष्मी वाढदिवस, गुरुवार दि. 28 एप्रिल रोजी महाराष्ट्र जंगी कुस्ती मैदान.
बैठकीस विश्वस्त मंडळ व कार्यकारणीच्या सदस्यांसह तानाजी हलगेकर, परशराम पाटील, नागेंद्र पाखरे, राजू पावले, प्रदीप देसाई, मधु पाटील, दूद्दाप्पा बागेवाडी, मनोहर अनु पाटील, दौलत कुरेशी, परशराम घाडी, प्रकाश पाटील, महादेव मंगनाईक, परशराम कंग्राळकर, हेमंत पाटील, भरमाना बाळेकुंद्री, अनिकेत पाटील, पृथ्वीराज पाटील, संदीप पाटील, श्रीधर कानशिडे आदी गावकरी उपस्थित होते.