घरात कोणी नसलेले पाहून दरवाज्याची कडी तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बेळगाव शहरातील गणेशपुर सरस्वती नगर येथे गुरुवारी घडली आहे.
बेळगाव येथील दैनिक सकाळचे क्रीडा प्रतिनिधी चंद्रकांत पाटील यांच्या घरी ही चोरी झाली असून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिस निरीक्षक धर्मट्टी अधिक तपास करत आहेत.
समजलेल्या अधिक माहितीनुसार चंद्रकांत पाटील सपत्नीक शिक्षक आहेत गुरुवारी सकाळी ते मुलांसह दोघेही शाळेला गेले होते त्यामुळे घरात कोणी नसलेले पाहून चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला व रोख रक्कमेसह सोन्या चांदीचे दागिने लंपास केले गुरुवारी दुपारी घराचा दरवाजा उघडा असल्याची कल्पना त्यांना भाडेकरूंनी दिली त्यानंतर ते घरी आले असता त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करताच घटनास्थळी पोलिसांनी दाखल होऊन श्वानपथका सह पहाणी केली तसेच तज्ज्ञांनी नमुने घेतले.
चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत चोरट्यांनी साडे तीन तोळे सोन्याचा हार ,कानातील टॉप्स आणि साखळी, अर्धतोळे सोन्याच्या दोन अंगठ्या,1 तोळे सोन्याचे कानातील खडे,कानातील तीन ग्रॅम त्रिकोणी रिंग, तीन तोळे चांदीचे पैंजण आणि 3 हजार रोख रक्कम वर चोरांनी असा अंदाजे तीन लाख रुपयांची ऐवज लंपास केला आहे.
गणेशपुर सरस्वतीनगर सारख्या उपनगरांमध्ये वाढत्या चोर्या या बेळगाव पोलिसांच्या डोकेदुखी ठरल्या आहेत भरदिवसा घरात कोणी नसलेले पाहून घर टार्गेट करून चोऱ्या करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे पोलिसांनी अश्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाढू लागली आहे.