बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुरगोड शाखेतून 4 कोटींचे दागिने चोरीला गेले आहेत.चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात यश मिळवले आहे.
बेळगाव जिल्हा पत सहकारी बँकेच्या (BDCC) मुरगोड शाखेतून रविवारी 4.37 कोटी रुपयांची रोकड आणि 1.65 कोटी रुपयांचे दागिने लंपास करण्यात आले आहेत.
पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार बँकेत चोरी केल्या नंतर चोरट्यांनी कोणतेही चोरी केलेले पुरावे सोडले नाहीत.चोरी करण्यासाठी त्यांनी बँकेत प्रवेश करण्यासाठी डुप्लिकेट चावी वापरली असल्याची शक्यता आहे.
चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआरही सोबत नेला. याप्रकरणी मुरगोड पोलिसांनी फिर्याद दाखल करून तपास सुरू केला आहे.