शहरातील नियती फाउंडेशनच्या अध्यक्षा, खानापूर भाजप महिला मोर्चा प्रभारी आणि बेळगाव ग्रामीण भाजप महिला मोर्चा उपाध्यक्षा डाॅ. सोनाली सरनोबत यांनी लिंगनमठ (ता. खानापूर) येथील श्री मरेम्मा देवी यात्रोत्सवाला भेट देऊन देवीचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले.
लिंगनमठ (ता. खानापूर) येथील श्री मरेम्मा देवी यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. सोनाली सरनोबत यांनी मार्गदर्शनपर विचार मांडताना सरकारकडून ग्रामीण भागातील लोकांना मिळणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती दिली.
तसेच या सोयीसुविधा ग्रामस्थांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असे सांगितले. याप्रसंगी भाजप पदाधिकारी, सदस्य तसेच गावातील महिला मंडळाच्या पदाधिकारी, सदस्यांसह गावकरी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमानंतर डॉ. सोनाली सरनोबत यांनी खानापूर तालुक्यातील कारलगा गावातील चव्हाटा मंदिराच्या यात्रा कार्यक्रमांतर्गत आयोजित हळदीकुंकू समारंभात सहभाग दर्शविला. यांच्या हस्ते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
आपल्या उद्घाटनपर भाषणात डॉ. सरनोबत यांनी सरकारच्या रोजगार हमी योजनेची माहिती देऊन ग्रामीण भागातील जनतेसाठी ही योजना किती हितावह आहे हे समजावून सांगितले.
त्याचप्रमाणे उत्तम समाज निर्मितीसाठी महिलांची भूमिका किती महत्वाची आहे हे देखील त्यांनी विशद केले. याप्रसंगी कारलगा परिसरातील भाजप पदाधिकारी आणि सदस्यांसह महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.