Friday, April 26, 2024

/

‘दादा मुलानी यांनी मारले सांबऱ्याचे मैदान’

 belgaum

महाराष्ट्राच्या पैलवान दादा मुलानी याने 14 व्या मिनिटाला हरियाणाच्या प्रवीण कुमार याला हप्ती भरून चितपट करत हजारो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत नेत्रदीपक विजय मिळवला आणि सांबऱ्याचे मैदान मारले.

सांबरा कुस्तीगीर संघटनेच्या कुस्तीगीर संघटनेच्यावतीने विमानतळावरील कुस्तीच्या आखाड्यात अनेक चटकदार कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र कर्नाटक आणि हरियाणा चे अनेक नामवंत मल्ल या कुस्ती मैदानात सामील झाले होते.Sambra wrestling

महाराष्ट्राचा दादा मुलानी आणि हरियाणाच्या प्रवीण कुमार यांच्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती झाली. सुरुवातीला दोन्ही पैलवानांनी एकमेकांचा अंदाज घेतला 14 व्या मिनिटाला दादा मुलानी याने हप्ती भरून चितपट करत विजय मिळवला.

 belgaum

या मैदानावर 50 हुन अधिक चटकदार कुस्त्या झाल्या सांबरा येथील मैदानात प्रथमच महिला कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.