छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल अर्थात जुन्या टी बी रोड वरचा उड्डाणपुलाच्या रस्त्याची दुरावस्था आलेली आहे. 24 जानेवारी 2017 रोजी या रस्त्यांच्या उड्डाणपुलाच्या रस्त्याचे काम पूर्ण झालेले आहे महापालिकेच्या ठरावानुसार या ब्रिजला छत्रपती शिवाजी महाराजाचे उड्डाणपूल असे नामकरण करण्यात आलेले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाच्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे अनेक खड्डे पडलेले आहेत आणि ब्रिज रस्त्यावर बसवण्यात आलेले स्टील उघडे झाले असल्यामुळे वाहनधारकांना रात्रीच्या वेळी वाहने चालवताना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे
बेळगाव शहरातील एका वेबसाईटने या उड्डाणपुलाच्या दुरुस्ती संदर्भात माहिती हक्क अंतर्गत माहिती मागवली होती त्या माहितीमध्ये रस्त्यांच्या कामाची जबाबदारी राज्य सरकारची आहे असे उत्तर देण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल, गोगटे सर्कल उड्डाणपूल किंवा कपिलेश्वर या उड्डाणपुलाच्या दुरुस्ती देखभाल कुणाकडे अशी माहिती आर टी आय अर्जात विचारण्यात आली होती रेल्वे खात्याने त्या संदर्भात माहिती दिली आहे.
उड्डाण पुलांच्या रस्त्यांच्या पृष्ठभागाच्या जबाबदारीची देखभाल राज्य सरकारची असेल असे उत्तर आर टी आय मध्ये मिळाले आहे.
माहिती हक्कानुसार मिळालेल्या माहितीवरून आता स्पष्ट झाले आहे की उड्डाणपुलाच्या रस्त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी राज्य सरकारची असेल अर्थात सार्वजनिक बांधकाम खाते किंवा महापालिकेकडून या रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल मात्र सध्याच्या परिस्थितीवरून राज्य सरकार याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
उड्डाण पुलावरील रस्तेच नव्हे तर उड्डाणपुलाच्या दुरुस्तीची दखल देखील राज्य सरकारची आहे असे समोर आले आहे त्यामुळे आता राज्य सरकारची जबाबदारी वाढली आहे.