बेळगाव सुवर्ण विधानसौधमधील विविध दुरुस्ती कामांसाठी १.५ कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या असून या दुरुस्ती कामांतर्गत पोलीस फ्रिस्किंग बूथ आणि सामान्य शौचालयाची दुरुस्ती,
प्रेशर टँक, कर्बस्टोन पेंटिंग, व्हर्टिकल ब्लाइंड्सची दुरुस्ती, मंत्री कक्षात नवीन व्हर्टिकल ब्लाइंड्स, सोफा कव्हर, दक्षिण आणि पश्चिम बाजूला नवे कुंपण, निवडक शौचालयांना सॅनिटरी फिटिंग सह अनेक विविध कामांची दुरुस्ती साठी निविदा काढण्यात आल्या आहेत. यासाठी एकूण १,५६,५८,१६८.२७ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
प्रस्तावित कामाची यादी आणि नियोजित खर्च खालीलप्रमाणे
निवडक क्षेत्रामध्ये फॉल्स सिलिंग – ९५१९६५.०५
संयुक्त सचिव (कॅबिनेट) साठी लाकडी विभाजन – ८८८६८२.८६
फ्रिस्किंग बूथ आणि टॉयलेट दुरुस्ती – ६२४२९९.७५
५०० लीटर प्रेशर टाकी पुरवठा आणि फिक्सिंग २२२०८७.३
कर्ब स्टोन्ससाठी पेंटिंग ७९००३१.९२
पार्किंग सुविधा २२२७८९०
उभ्या पट्ट्या आणि सोफा कव्हर्स १२६२३६५
काटेरी तारांचे फेंसिंग १३९९४०३.७५
नाली काम १७६८७९२.५६
वॉच टॉवर्सची दुरुस्ती आणि पेंटिंग २५१७२८.२२
पेंटिंग (इमारत, आणि WTP) १३३०४९१.०८
प्लंबिंग फिटिंग्ज १८८५३५०
कंपाउंड वॉलच्या बाहेर रान कापणे २७५०००
चिक मॅटची दुरुस्ती १३४७२३०.७८
संगणक आणि उपकरणे पुरवणे ४३२८५०