हिजाब संदर्भातील कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अंतिम निकालानंतर कायदा व सुव्यवस्था भंग होण्याचे प्रकार घडू नयेत यासाठी आज शहरातील संवेदनशील भागांसह शाळा-महाविद्यालयांबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हिजाब संदर्भातील न्यायालयाच्या निकालानंतर विजयोत्सव अथवा निदर्शने होण्याची शक्यता गृहीत धरून बेळगावसह संपूर्ण जिल्ह्यात आज मंगळवारी सकाळपासून सीआरपीसी कलम 144 अन्वये जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे.
पुढील आदेशापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदी असणार आहे. जमावबंदीचा आदेश याबरोबरच शहरातील संवेदनशील भागांसह लिंगराज कॉलेज, ज्योती कॉलेज, जीएसएस कॉलेज, सरदार्स हायस्कूल, बेननस्मिथ हायस्कूल, इस्लामिया हायस्कूल आदी शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारावर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या ठिकाणी चौकशी करूनच प्रत्येकाला प्रवेश दिला जात होता. बेळगाव जिल्ह्यातील जमावबंदीचा आदेश कधीपर्यंत याबाबतचा निर्णय झाला नसून किमान उद्या पर्यंत म्हणजेच बुधवारपर्यंत लिहा 144 कलम लागू असण्याची शक्यता आहे.