मॉर्निंग वाकिंग करणाऱ्या इसमाला पाठीमागून अनियंत्रित मालवाहू ट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला तर या घटनेत रस्त्याशेजारी झाड देखील उखडून पडल्याची घटना घडली आहे.जुना बी रोड अर्थात बी-एस येडुरप्पा मार्ग येथे बळळारी नाल्या जवळ रविवारी सकाळी सहाच्या दरम्यान हा अपघात झाला असून यात प्रताप लक्ष्मण सालगुडे वय 49 वर्ष राहणार जुने बेळगाव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.
अपघाताबाबत समजलेल्या माहितीनुसार मयत प्रताप हे दररोज नेहमीप्रमाणे जुने बेळगाव पासून अलारवाड क्रॉस पर्यंत वाकिंग ला गेले होते रस्त्याच्या कडेने चालत असते वेळी पाठीमागून नियंत्रण सुटलेल्या ट्रक ने त्यांना जोराची धडक दिली या घटनेत त्यांच्या डोक्याला जोराची धडक बसल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
मालवाहू गाडीच्या चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं होतं त्यामुळे चालकाला गाडी नियंत्रित करता आली नाही, सदर चार चाकी इतकी वेगात होती की, रस्त्या शेजारील झाडाला आदळली त्यात झाड देखील उखडून पडले होते यानंतर त्या गाडीने चालत जाणाऱ्या प्रताप यांना मागून जोराची धडक दिली त्या घटनेत प्रताप यांचा मृत्यू झाला.घटनास्थळी रहदारी दक्षिण पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.
ओल्ड पी बी रोड सारख्या रहदारी असलेल्या रस्त्यावरून मॉर्निंग वॉक करणे प्रताप यांना अंगलट आले असून जीव गमवावा लागला आहे बेळगाव शहरांमध्ये सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या अधिक आहे अश्या अपघाता मुळे मैदान किंवा ओसाड रस्त्यावर वॉकिंग करणे गरजेचे आहे.
मयत प्रताप हे जुने बेळगाव येथील ज्ञानेश्वरी पारायण सेवा मंडळाचे उपाध्यक्ष होते ते सेंट्रींग व्यवसाय करत होते त्यांचा स्वभाव अगदी मनमिळावू होता अचानक यांचे अपघातात निधन झाल्याने जुने बेळगाव परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्रताप दररोज मॉर्निंग वॉकिंगला जात असत रविवारी सकाळी उठल्यानंतर त्यांच्या पत्नीने ‘आज तुम्ही वाकिंग ला जाऊ नका’ पाहुण्यांच्या गृह प्रवेश आहे तिकडे जाऊया असा तगादा लावला होता मात्र नियतीला मंजूर नव्हते नेहमी प्रमाणे ते वाकिंग ला गेले अन आजचे वाकिंग त्यांचे आयुष्यातील शेवटचे वाकिंग ठरले असल्याची जुने बेळगाव येथे चर्चा आहे.