सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने 15 मे रोजी मराठा समाजाचे स्वामी श्री मंजुनाथ स्वामी यांचा सत्कार आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाच्या नियोजनासंबंधित जत्तीमठ येते रविवार दिनांक 13 रोजी संध्याकाळी पाच वाजता मराठा समाजाची बैठक आयोजित केली आहे तरी सर्व समाज बांधवांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
नुकताच मराठा समाजाच्या एका शिष्टमंडळाने बेंगलोर आणि होदेगिरीच्या दौरा केला होता आणि बेंगलोर मुक्कामी मंजुनाथ स्वामी यांची भेट घेऊन त्यांना सत्कारासाठी आमंत्रित केले होते. नुकताच मंजुनाथ स्वामीजी यांचा पट्टाभिषेक झाला आहे यासाठी बेळगाव मध्ये त्यांचा सत्कार करावा याचे नियोजन करण्यात येणार आहे.
याशिवाय बंगळुरूला गेलेल्या शिष्टमंडळाने शहाजी महाराजांच्या होदेगेरे येथील समाधीला भेट दिली होती तर दुसर्या एका शिष्टमंडळाने कोल्हापूर मुक्कामी खासदार संभाजी राजे यांची भेट घेतली होती आणि मराठा समाजाच्या एकत्रीकरणासाठी संभाजी राजांना देखील बेळगावला येण्याचे आमंत्रण दिला होते व मराठा आरक्षणासाठी लढलेल्या स्वामीजींचा सत्कार केला होता.
या सगळ्या पार्श्वभूमीवर खासदार संभाजी राजे यांचा बेळगाव दौरा आणि मंजुनाथ स्वामी यांच्या सत्कार कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी सदर बैठकीत चर्चा होणार आहे.