मित्रासह धबधब्या वर पार्टीसाठी गेलेला अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी बुडाला आहे सदर घटना घटना रविवारी दुपारी रामनगर जवळील आसू येथे घडली.
सहा मित्र मिळून एळये येथील वज्र धबधब्यावर पार्टीसाठी गेले होते त्यावेळी श्रीहरी रामकृष्ण अंगडी (वय 21) रा. लोंढा हा धबधब्या मध्ये बुडून बेपत्ता झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार श्रीहरी हा बेळगाव येथील केएलई इंजिनीअरिंग महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. सर्व मित्र मिळून रविवारी दुपारी बारा वाजता लोंढा येथून निघून आसू वनक्षेत्रात असलेल्या एळये येथे वज्र धबधब्यावर पार्टी करण्यासाठी गेले होते.
हा धबधबा धोकादायक असल्याने वनविभागाने धबधब्यावर जाण्यास बंदी घातली आहे. तरीही सदर ते सहा जण तिथे जाऊन पाण्यात उतरून मौजमजा करत होते त्यावेळी श्रीहरी पाण्यात बुडून बेपत्ता झाला आहे.
श्रीहरी या युवकाला पोहता येत नसल्याने तो पाण्यातील वेलीत अडकला असल्याची शक्यता आहे यावेळी तो बेपत्ता झाला आहे.या घटनेची माहिती त्याच्या समवेत गेलेल्या युवकानी रामनगर पोलिसांना दिली रामनगर पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद यांनी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेत श्रीहरी याचा शोध केली पण तो सापडला नाही.
उद्या सोमवारी याच्यातील तज्ज्ञांच्या सहाय्यनर शोध मोहिम राबवली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.