Monday, January 20, 2025

/

आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघातर्फे हरे कृष्ण महोत्सव

 belgaum

बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन), च्या हरेकृष्ण सत्संग भवन निलजी, शाखा यांच्यावतीने हरेकृष्ण महोत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. श्री गजानन मंगल कार्यालय निलजी येथे श्री श्री नीताई गौरसुंदर (कृष्ण बलराम) यांच्या २१ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार दिनांक ६ मार्च पासून या कार्यक्रमाची सुरुवात होणार असून ६ मार्च रोजी सायंकाळी ४ ते रात्रौ ८ पर्यंत नगर संकीर्तन (हरिनाम दिंडी) आणि प्रसाद, सोमवार दिनांक ७ मार्च आणि शुक्रवार दिनांक ११ मार्च रोजी दररोज सायंकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत वैष्णव भजन, आणि ८.०० ते ९.३० या वेळेत प्रवचन, आरती आणि प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.Iskcon

शनिवार दिनांक १२ मार्च रोजी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत वैष्णव भजन कीर्तन तसेच ५ ते ७ या वेळेत श्री श्री नीताई गौरसुंदर अभिषेक, त्यानंतर ७ ते ८.३० या वेळेत श्रीमान सुदाम प्रभुजी, मुंबई यांचे प्रवचन, रात्रौ ८.३० ते ८.४० अध्यात्मिक नाटक, ८.४० ते ९.०० आरती आणि ९ नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

हरेकृष्ण सत्संग भवन निलजी, शाखा यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात भाविकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.