Friday, January 24, 2025

/

साहित्य संमेलने ही परिवर्तनाची द्योतक- रणजित चौगुले

 belgaum

आपल्याकडची वाचनालय म्हणजे केवळ पुस्तकांची शोभा वाढवणारी नसावी तर ज्या लेखकांच्यामुळे समाजामध्ये परिवर्तन घडलेले आहे अशा लेखकांच्या विचारांवर पुस्तकांवर चार लोकानी एकत्र जमून करावी आणि त्यातून काहीतरी निर्माण होईल का हे पाहावे असे मत साहित्यिक रणजित चौगुले यांनी व्यक्त केले

बेळगाव बलभीम साहित्य संघातर्फे कुद्रेमनी येथे 16 वे मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी संमेलनाचे उदघाटन केले.

साहित्य चर्चा करणारे हे सारे शिक्षित असले पाहिजेत असे नाही तुम्ही कोठे राहता याच्याशी देणंघेणं नाही तुमचा व्यवसाय कोणता आहे हा महत्त्वाचा नाही परंतु तुम्ही साहित्यिक प्रेमी आहात की नाही हे फार महत्वाचे आहे.संस्कृती ही परिवर्तनशील असते माणूस निसर्ग आणि संस्कृती हा परिवर्तनाचा भाग असतो हजार वर्षे झाली चिमणीचे घरटे कधी बदललं का मुंग्या घर बांधतात ते वारूळ कधी बदल करा पण एक हजार वर्षांमध्ये माणसाचं घर पुष्कळ वेळा बदललेला आपणाला दिसून येते त्याची भाषा बदलली माणसाची संस्कृती बदलली कारण बदल करण्याचं सामर्थ्य फक्त माणसातच आहे ही संमेलनं कशासाठी तर त्या परिवर्तनासाठीच. संमेलंनं ही परिवर्तनाची द्योतक आहेत.Kudremani

ते पुढे म्हणाले की आज कालची मुलं विशेषता महाविद्यालयातील मुलं ही अवांतर वाचन करत नाहीत कारण त्यांना परीक्षेमध्ये जखडून ठेवले जाते त्यामुळे त्यांचे वाचन हे परीक्षेपुरते मर्यादित असलेले आपणाला दिसून येते आणि पालकांना सुद्धा याचं फारसं काही देणंघेणं नसतं.

वाचनाच्या आवडी-निवडी सुद्धा काळानुसार बदलत चालले आहे वाचनाच्या दिशा बदलत चालले आहेत पूर्वी कथा कादंबरी नाटक वाचलं की काही तरी वाचलंय असं लोकांना वाटत होतं परंतु आज त्यांना एखाद्या पोलिस अधिकार्‍याच्या अनुभव वाचावीशी वाटतात एका उद्योगपतीची यशोगाथा वाचाविशी वाटते एका राजकारण्याचे जीवन जाणून घ्यावंसं वाटतं एका अभिनेत्याची माहिती समजून घ्यावीशी वाटते आणि त्यामुळेच या लोकांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या आवृत्या सुद्धा मोठ्या प्रमाणात निघालेल्या दिसून येतात असेही ते म्हणाले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.