के. आर. शेट्टी स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे आयोजित दुसऱ्या के. आर. शेट्टी स्मृती चषक टी -20 क्रिकेट स्पर्धेतील आज झालेल्या सामन्यात विश्रुत स्ट्रायकर्स संघाने प्रतिस्पर्धी मार्ग रायझिंग स्टार संघावर 5 गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
कॅम्प येथील युनियन जिमखाना मैदानावर नाणेफेक जिंकून विश्रुत स्ट्रायकर्स संघाने प्रतिस्पर्धी मार्ग रायझिंग स्टार संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले. मार्ग रायझिंग स्टार संघाचा डाव 16.5 षटकात सर्व गडी बात 109 धावा असा संपुष्टात आला. विश्रुत स्ट्रायकर्स संघाच्या विनीत अडूरकर याने भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन करताना अवघ्या 12 धावा तब्बल 5 गडी बाद करताना प्रतिस्पर्धी संघाला खिंडार पाडले.
प्रत्युत्तरादाखल फलंदाजी करताना विश्रुत स्ट्रायकर्सने 13.4 षटकात तीन गडी गमावून 111 धावा काढत सामना जिंकला. त्यांच्या रवी उकळी याने 10 चौकार आणि एका षटकारासह सर्वाधिक 52 धावा झळकविल्या. या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी विश्रुतचा गोलंदाज विनीत अडूरकर हा ठरला.
सामन्यानंतर आयोजित बक्षीस समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून मीना अनिल बेनके, प्रतीक्षा चव्हाण, मीनल पवार आणि नवश्री काईरे हे उपस्थित होते.
या मान्यवरांच्या हस्ते सामनावीर विनीत अडुरकर याला आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे उत्कृष्ट झेल, सर्वाधिक षटकार, इम्पॅक्ट खेळाडू ही पारितोषिके अनुक्रमे सुनील सक्री, निलेश पाटील आणि रवी उकळी यांना प्रदान करण्यात आली.