बनावट स्टॅम्प पेपर घोटाळा उघडकीस आणलेले खानापूर येथील सामाजिक कार्यकर्ते जयंत मुकुंद तिनईकर (वय 62) यांच्यावर तीन ते चार दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी जीवघेणा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे.
शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना देसुर क्रॉस जवळ घडली आहे.
या घटने बाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञातांनी देसुर जवळ कार अडवून लोखंडी रॉड व टॉमीच्या साहाय्याने त्यांना बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत त्यांचा उजवा हात उजवा पाय मोडला आहे.
जखमी अवस्थेत जयंत तिनईकर यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खानापूर शहरातील सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार आणि सरकारी जागेवरील बेकायदेशीर अतिक्रमण या विरोधात त्यांनी दंड थोपटले आहे.
या प्रकरणी केलेल्या तक्रारीतून मारहाण झाल्याचा संशय तिनईकर यांनी व्यक्त केला आहे.