महाशिवरात्रीनिमित्त येथील नार्वेकर गल्ली मधील ज्योतिर्लिंग देवस्थानात रात्री एक वाजता देवाला लघुरुद्र अभिषेक करण्यात आला. तसेच अहोरात्र देवाचा जागर करून केदार कवच आणि नामस्मरण करण्यात आले. तसेच पहाटे चार वाजता काकड आरती करण्यात आली.दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवरात्रीनिमित्त मंदिरात धार्मिक विधी करण्यात आले
यावेळी सकाळी पुन्हा देवाला दुग्धाभिषेक उसाचा रस आणि आंब्याचा मोहर घालून अभिषेक करण्यात आला. देवी पार्वती शंकरांला प्रसन्न करून घेण्याकरीता उसाचा रस आणि आंब्याच्या मोहराचा अभिषेक केला होता .
त्यामुळे भगवान शंकर देवी पार्वतीला त्वरित प्रसन्न झाले होते आणि त्यांनी देवी पार्वतीला वरदान मागण्यास सांगितले .यावेळी महादेव म्हणाले की जे कोणी महाशिवरात्रीला शिवपिंडीवर उसाचा रस आणि आंब्याचा मोहराचा अभिषेक करेल त्याला मी प्रसन्न होऊन त्यांची सर्व इच्छा पूर्ण करेल .त्यामुळे स्कंद पुराणानुसार शिवरात्रीनिमित्त शिवपिंडीला ज्योतिर्लिंग मंदिरात हा अभिषेक करण्यात आला .
यावेळी पौरोहित्य सचिन जोशी यांनी केले.. तसेच देवाला 51 लिटर दुग्धाभिषेक करून आरती करण्यात आली. त्यानंतर बारा वाजता देवाला खिचडीचा आणि फळांचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर मंदिरात येणाऱ्या भाविकांना तीर्थ प्रसादाचे वाटप करण्यात आले.