Sunday, January 5, 2025

/

देशातील पहिली फॉरेस्ट कॅनोपी ट्रेन…

 belgaum

देशातील पहिल्या फॉरेस्ट कॅनोपी ट्रेनचा शुभारंभ चोर्ला
येथील वाईल्डर नेस्ट नेचर रिसॉर्ट येथे करण्यात आला.या प्रकल्पामुळे झाडाच्या छतावरून पश्चिम घाटाचे सौंदर्य जवळून न्याहळणाची संधी पर्यटकांना लाभणार आहे.गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या हस्ते फॉरेस्ट कॅनोपी ट्रेनचा शुभारंभ करण्यात आला.

स्वप्नगंधा रिसॉर्टच्या चे मॅनेजिंग डायरेक्टर कॅप्टन नितीन धोंड यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारला आहे.असे प्रकल्प गोव्यात आणि देशात अन्य ठिकाणी उभारले गेले तर पर्यटकांना निसर्गाला आणि तेथील जैवविविधतेला कोणताही धक्का न लावता निसर्ग सौंदर्य न्याहाळण्याची संधी मिळणार आहे असे कॅप्टन नितीन धोंड यांनी सांगितले.

वाईल्डर नेस्टच्या व्यवस्थापनाने पश्चिम घाटातील चोर्ला परिसरात स्वप्नगंधा आणि वाईल्डर नेस्ट या रिसॉर्टची उभारणी करून इको फ्रेंडली पर्यटनाला चालना दिली आहे असे प्रमुख पाहुणे प्रतापसिंह राणे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

Forest conopy
फॉरेस्ट कॅनोपी ट्रेन मधून प्रतापसिंह राणे यांनी बाबा धोंड आणि अन्य मान्यवरांच्या समवेत दोन वेळा फेरी मारून निसर्गसौंदर्याचा आनंद घेतला.प्रतापसिंह राणे यांनी चोर्ला परिसरातील विकासाला चालना देण्यासाठी आणिफॉरेस्ट कॅनोपी ट्रेन प्रकल्पाला सहकार्य केल्या बद्दल किरण ठाकूर यांनी प्रतापसिंह राणे यांचे आभार मानले.

फॉरेस्ट कॅनोपी ट्रेन प्रकल्पाची उभारणी बेळगावच्या रचना इन्फोटेक यांनी केली असून भारतात तयार झालेली पहिली स्लोप ट्रेन प्रकल्प आहे.स्लोप ट्रेनने साधारणपणे ११० मीटर अंतरा पर्यंत जंगलाचे सौंदर्य चारही बाजूने न्याहाळता येते.एका बाजूला वज्र सकल धबधबा आणि महादायी अभयारण्य न्याहाळता येते. स्लेंदर लोरीस आणि हॉर्न बिल यांचे दर्शन घडते.पणजी शहर आणि अरेबियन समुद्राचे देखील स्लो प ट्रेनने प्रवास करताना दर्शन घडते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.