बेळगाव जिल्हा काँग्रेस ‘ॲक्टिव्ह’ मोडमध्ये आले असून पदवीधर मतदार संघातील पक्षाचा उमेदवार निश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्वतयारीची बैठक नुकतीच काँग्रेस कार्यालयात पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने काँग्रेस युवा नेते किरण साधुण्णावर यांच्या नांवाची चर्चा झाल्याचे समजते.
मागील महिन्यात झालेल्या विधान परिषद निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यातील दोन जागांपैकी एक जागेवर विजय मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्ते काँग्रेस राजकीय वर्तुळात उत्साह निर्माण झाला आहे. याचा फायदा घेण्यासाठी पदवीधर मतदारसंघात देखील जोरदार लॉबिंग करण्याबाबत काँग्रेस कार्यालयामध्ये बैठक झाली.
सदर बैठकीत बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार, विधान परिषद सदस्य आणि ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीमध्ये कार्याध्यक्षांनी पदवीधर मतदार संघासाठी कोणाला उमेदवारी द्यावी? याबाबत मते जाणून घेतली. त्यावेळी किरण साधुण्णावर यांचे नांव प्राधान्याने पुढे आले. त्यामुळे काँग्रेस युवा नेते किरण साधुंनावर यांना पदवीधर मतदारसंघातून उमेदवार करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्यांच्या नावावर केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी शिक्कामोर्तब केल्याचे समजते.
बेळगाव जिल्ह्यातील पदवीधर मतदारसंघात बेळगाव जिल्ह्यासह बागलकोट आणि विजापूर हे दोन जिल्हे देखील येतात. बेळगाव, बागलकोट आणि विजापूर जिल्ह्यामध्ये पदवीधर आणि शिक्षक या दोन उमेदवारांसाठी बाहेर जिल्ह्यांना भेटी देऊन मतं अजमावण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. किरण साधुंनावर हे पंचम साली लिंगायत समाजाचे युवा नेतृत्व असून बागलकोट, विजापूर आणि बेळगाव जिल्ह्यांमध्ये पंचम साली समाज खूप मोठा आहे.
भाजपचे पदवीधर संघाचे उमेदवार हनुमंत निराणी यांना जोरदार टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडे किरण साधुण्णावर हा उत्तम पर्याय असल्याचे या बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांमध्ये बोलले जात होते. किरण साधुणणावर यांच्या नांवाच्या जोरदार चर्चेबरोबरच साधुंनावर यांनी बागलकोट व विजापूर जिल्हामध्ये फिरवून चर्चा करावी, याबाबत बैठकीत ग्रीन सिग्नल देण्यात आल्याचे कळते.