कर्नाटक राज्याचे महामहिम राज्यपाल थावरचंद गहलोत हे बेळगाव येथील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री कपिलेश्वर मंदिराला भेट देणार आहेत.मंगळवारी राज्यपाल गेहलोत हे राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या समारंभात सहभागी होणार आहेत त्या निमित्ताने ते बेळगाव दौऱ्यावर आहेत सायंकाळी पाच वाजता ते कपिलेश्वर मंदिर ला भेट देऊन देऊन दर्शन घेणार आहेत.
राज्यपाल गेहलोत यांचा मंगळवारी कपिलेश्वर मंदिरचा भेट कार्यक्रम निश्चित झाल्याने एक दिवस अगोदर म्हणजे सोमवारी सायंकाळी पाच वाजता पोलीस खात्याच्या वतीने मॉकड्रील घेण्यात आली त्या निमित्ताने मंदिर परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला होता.मंगळवारी राज्यपाल मंदिराला भेट देण्याची पहिली वेळ असल्याने मंदिरात जय्यत तयारी करण्यात आली आहे ट्रष्टीना मन्दिर प्रशासनाला राज्यपाल भेटीची उत्सुकता लागली आहे.
‘राणी चन्नम्मा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ
बेळगावमधील राणी चन्नम्मा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ बुधवार दिनांक ९ मार्च रोजी सुवर्ण विधान सौध येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. एम. रामचंद्रगौडा यांनी दिली.
बेळगावमध्ये माहिती विभागाच्या कार्यालयात सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हि माहिती दिली आहे. यावेळी प्रा. एम रामचंद्रगौडा म्हणाले, सुवर्ण विधानसौध मध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल आणि कुलपती थावरचंद गेहलोत हे असणार आहेत.
तर प्रमुख अतिथी म्हणून उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथनारायण हे उपस्थित राहणार आहेत. वैज्ञानिक वीरेंद्र चव्हाण हे या समारंभात उपस्थितांना उद्देशून भाषण करणार आहेत. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या पदमश्री राजीव तारा नाथ, संगीत क्षेत्रातील डॉ. एच. सुदर्शन, वादिराज देशपांडे या मान्यवरांना विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी देऊन गौरविण्यात येणार आहे.
या दीक्षांत समारंभात ३५४८४ विद्यार्थ्यांना पदवी, २७३९ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात येणार आहे. याचप्रमाणे पदव्युत्तर डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या १८८ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. एम. रामचंद्रगौडा यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. बसवराज पद्मशाली, मूल्यमापन विभागाचे कुलसचिव प्रा. विरनगौडा पाटील, वित्त अधिकारी प्रा. डी. एन. पाटील आदी उपस्थित होते.