बेळगावच्या दौऱ्यावर असलेल्या राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी आज बुधवारी शहरातील स्वामी विवेकानंद सेवा प्रतिष्ठानच्या गंगम्मा चिकुंबीमठ बाल कल्याण केंद्राला सदिच्छा भेट देऊन तेथील बालकांसमवेत कांही क्षण घालविले.
गंगम्मा चिकुंबीमठ बाल कल्याण केंद्राला सदिच्छा भेट देणाऱ्या राज्यपालांना स्वामी विवेकानंद सेवा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्राच्या कार्यशैलीची तसेच तेथे उपलब्ध असलेल्या सर्व मूलभूत सुविधांची माहिती दिली सदर संस्था उपेक्षित -वंचित मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी
समाजाभिमुख कार्य करत असल्याबद्दल राज्यपाल गेहलोत यांनी प्रशंसोद्गार काढून समाधान व्यक्त केले. राज्यपालांनी गंगम्मा चिकुंबीमठ बाल कल्याण केंद्रातील बालकांशी संवाद साधून त्यांना कांही प्रश्न विचारले. त्यावर मुलांनीही आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
मुलांच्या प्रतिक्रिया एकून घेतल्यानंतर राज्यपालांनी सर्व मुलांना उत्तम शिक्षण घ्या आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात या. समाजात उन्नत स्थान मिळवून भारताचे उत्तम नागरिक बना, असे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी खासदार मंगला अंगडी, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ संस्थेचे अध्यक्ष मनीष बंडमलकर, कार्यदर्शी गिरीष इनामदार आदी उपस्थित होते.