अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेच्या कर्नाटक राज्य शाखेतर्फे उद्या दि 29 आणि 30 मार्च रोजी ग्राहकांची होणारी फसवणूक त्यांच्या समस्या व निवारण आणि जनजागृती संदर्भात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष विख्यात शिनाॅय यांनी उपरोक्त माहिती दिली.
अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेची स्थापना 1995 साली महाराष्ट्रातील नागपूर येथे झाली आणि 1999 पर्यंत अधिकृत संस्था म्हणून तिची नोंदणी झाली असे सांगून शिनाॅय यांनी परिषदेच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली.
त्याचप्रमाणे उद्या व परवा कन्नड साहित्य भवन येथे आयोजित करण्यात येणाऱ्या परिसंवादामध्ये ग्राहकांची फसवणूक, ग्राहकांच्या तक्रारी, त्या तक्रारींचे निवारण, जनजागृती यावर चर्चा होणार असल्याचे सांगितले.
पत्रकार परिषदेस अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेचे कर्नाटक राज्य अध्यक्ष मुक्तार सलीम इनामदार राष्ट्रीय सरचिटणीस देवेंद्र तिवारी राष्ट्रीय संयोजक सचिव सुरज प्रकाश महिला विभागाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा अर्चना मेस्त्री राज्य अध्यक्ष विजयालक्ष्मी नाईक आणि महिला व विभागाच्या राष्ट्रीय सरचिटणीस श्वेतांबरी राऊत यांच्यासह परिषदेचे सदस्य उपस्थित होते.