Sunday, July 14, 2024

/

‘किल्ला साफसफाई मोहिमेसाठी युवक सरसावले’

 belgaum

भुईकोट किल्ला हा बेळगाव शहराचा मानबिंदू आहे किंबहुना बेळगावची ओळख ही किल्ला तलाव आणि त्या समोर असलेला भुईकोट किल्ला यावरूनच सापडते. बेळगाव शहरात प्रवेश करणारा प्रत्येक माणूस ज्यावेळी शहरात येतो त्यावेळी त्याला या सुंदर किल्ल्याचे दर्शन होते. त्याच वेळी तो या शहराच्या प्रेमात पडतो.

भारतभर कोणत्याही शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारे किल्ले ठराविक शहरातच आहेत. त्यापैकी बेळगाव एक आहे. हे देखील बेळगावचं वैशिष्ट्य आहे. परंतु या किल्ल्याच्या तटबंदीवर झाडेझुडपे वाढली आहेत त्यामुळे किल्ल्याच्या तटबंदीला धोका निर्माण झाला आहे.

प्राचीन किल्ला जतन करायचा असेल,तर त्याला खूप मेहनत करावी लागेल सरकार सोबत नागरिकांनी देखील हा किल्ला जतन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.सध्या काही दिवसांपासून दुर्गवीर सेवा संघाच्या वतीने या किल्ल्यांची साफसफाई झाडंझुडपे काढण्याचं काम दर रविवारी करण्यात येत आहे

या उपक्रमात नागरिकांनी सहभाग दर्शवणे गरजेचे आहे. कारण आपल्या गावाची ओळख जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. या कर्तव्य भावनेतून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हा किल्ला वाचवला पाहिजे. टिकवला पाहिजे. ऐतिहासिक संवर्धन करत किल्ला पुढच्या पिढीसाठी आपण संक्रमित केला पाहिजे. Fort bgm

सकल मराठा समाजाच्या वतीने या कामासाठी बळ देण्याचे प्रयत्न चालू आहेत.आज त्याचाच भाग म्हणून दुर्गवीर सेवा संघ जे कार्य करत आहेत त्यांना बळ देण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने भेट देऊन लागेल ती मदत देण्याचे व सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले.दुर्गवीरचा किल्ला सफाई चा कामाला योग्य ते पाठबळ देण्याचे आश्वासन सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिले.

यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने किरण जाधव,चंद्रकांत कोंडुस्कर,माजी महापौर शिवाजी सुंठकर,आमदार अनिल बेनके,प्रदीप अष्टेकर,गुणवंत पाटील, सुनील जाधव, महादेव पाटील,सागर पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.